Thursday, March 31, 2022

तूच कर्ता

तूच कर्ता आणि करविता,
तूच करशी माझ्याकरिता  !
गणेशा, तू माझा पिता 
अन् मी तुझी लाडकी दुहिता !
सारे काही होते माझ्याच भल्याकरता, 
माझा तुजवर भरवंसा पुरता !
तूच कर्ता आणि करविता,
तूच करशी माझ्याकरिता.....!!
✍️ सुजाता.

No comments: