Wednesday, March 31, 2021

तू

अबोल माझ्या भावनांचे
शब्द तू होशील का,
मुग्ध माझ्या गीतास या,
सूर तू देशील का.....
अवसेच्या या घोर राती,
चांदणे बनशील का, 
अर्थहीन झाले जिणे हे,
सार्थ तू करशील का....
✍ सुजाता.

No comments: