रूपातच तुझ्या, सर्व विश्व सामावते ना !
तू विघ्नहर्ता, तूच कर्ता आणि करविता...
सर्वप्रथम तुज पूजितो,
काम सफल होण्याकरिता.
आनंदिते मी तुझे रुप न्याहाळता,....
तुझे नाम घेता, तुझे गीत गाता.
चिंतीते मी तुझ्या रूपाची प्रतिकात्मता,
सकळ विद्यांचा तू अधिपती, तू ज्ञानदाता !
तू एकदंता, समचित्ता, चतुर्भुज तू,फलदाता
सुख, संपत्ती, आरोग्य अन् मोक्षदाता !
विश्वाचा स्वामी तू, धरणीधर - करूणाकरा,
मी पतित, मजवरी कृपा करा.
"मोद" देशी तू "मोदक" खाता,
लंबोदर तू, माझ्या पापांचे क्षालन करा !
ओंकार स्वरूपा, आले मी तुज शरण....
मुक्त करी मज, तोडावे आता सारे बंधन !
✍️ सुजाता 🙏🌺🙏

No comments:
Post a Comment