मातीतूनी मूर्ती बनवली,
देवत्वही प्राप्त झाले,
पूजा झाली, सोहोळा झाला ......
अंति विसर्जनही ठरलेले....!
नश्वर सारे,.... सारे क्षणभंगुर
सगुणातून निर्गुणाकडे जायाचे.
आवाहनानंतर विसर्जन निश्चित,
काहीच ना इथे *ठेहरायाचे* ....!
देह क्षणिक, *चैतन्य* अंतिम सत्य....
कशालाच ना चिकटून बसायाचे,
निर्गुण ब्रह्म केवळ तरते.....
बाकी सारे बुडायाचे.....!!
✍️ सुजाता 🙏🙏

No comments:
Post a Comment