Wednesday, September 21, 2022

इच्छा

आता एवढीच इच्छा, 
मी भुई चे अंग व्हावे,.....
रोमरोमांतून माझ्या, 
नवनिर्मितीचे कोंब फुटावे....!
मी फुलांचे रंग व्हावे,
अन् धुंदीचे गंध पसरावे.....
मी नदीच्या संग वहावे,
अन् वाऱ्यासंगे लहरावे.....
पाखरांचे मी पंख बनावे,
झेप घेण्या, आकाश व्हावे !
अंधारल्या जीवांसाठी,
अवघा देह "चांदणे" असावा.
भुकेजल्या तान्ह्या साठी
करुणेचा पान्हा फुटावा.
शेवटी श्वास जाताना 
जगण्याचा 'महोत्सव' व्हावा 
जगण्याचा 'महोत्सव' व्हावा !!
✍️ सुजाता 



No comments: