देवानी वरदान दिलंय मला,
मनातल्या भावना कागदावर उतरवण्याचं
नाही तर माझ्याच भावनांच्या स्तुनामीमध्ये
वाहून गेले असते,.... मीच.....!
आता कागदांना भिजवून, डोळे कोरडे होतात,
अंगार उतरवून वहीवर, मन होतं शांत
आणि कडू जहर दुःख पिऊन,
कवितेत उमटतं "स्मित"!
जे मोठ्याने ओरडू नाही शकत मी,
ते कागदावर ओतत जाते,....
स्वतःला रिती करत
"सद्चिदानंदा"नी भरत जाते....!!
✍️ सुजाता

No comments:
Post a Comment