समवयस्कांची साथ मिळते,
आतापर्यंत कष्टात काढलेले आयुष्य,
आता मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य मिळते.
काय नसते वृद्धाश्रमात......?
कोणी प्रत्यक्ष जाऊन बघितले ??
दुरून नुसतीच नावं ठेवायची,.....
काही जणांना खोडच असते !
वया परत्वे परिपक्वपणा दाखवून
तरुणांनाही स्वातंत्र्य द्यावे,.....
आपणच सारे करण्याचा अट्टाहास सोडून,
त्यांनाही जबाबदारीचे भान द्यावे !
*अथश्री* सारखे सहनिवास हवेत वाढाया,
"जनरेशन गॅप" सामंजस्याने भराया,
वृद्धाश्रम नव्हे, "ज्येष्ठ सहनिवास" हवे म्हणाया
लांब राहिले, म्हणून आटत नसते माया,
परिपक्व फळाच्या गोडव्याची किमया.....
संध्याछाया *सुखविती* हृदया.....!
✍️ सुजाता

No comments:
Post a Comment