हवा कशाला मोक्ष,
किंवा 'कुंड़लीनीची जागृती....
आयुष्याचा प्रवास मस्त आहे,
कशाला मृत्यूची भिती ?
खूप पाऊस पड़तोय?
ऑफिसला दांड़ी मारून चिंब भिजावं,
पक्षांच्या सूरात सूर मिसळून
हळूच गाऊन घ्यावं...!
कधीतरी पहाटे ऊठून
सूर्य उगवताना पहावं....
झाड़ांवर कोवळं ऊन
उलगड़ताना दिसावं....!
मंदिरात, काही न मागता,
नुसतंच, घंटेचा 'नाद' ऐकावा,
कोकिळेला साद देऊन,
'प्रतिसाद ' घ्यावा....!
सूर्यास्तानंतरही समुद्रकिनारी बसावं,..
हलकेच अंधाराचं पांघरूण
अंथरलेलं जाणवावं...!
अशा छोटया छोटया जाणिवा,
जगणं समृद्ध करतात,
आयुष्याचं लेणं पवित्र, -
'शुदध' करतात....!!
-✍सुजाता

No comments:
Post a Comment